लोणावळ्यात २१ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन

Table of Content

पुढील दोन महिन्यांत ३५ ते ४० कोटींच्या पाच प्रमुख रस्त्यांची कामे सुरू होणार


लोणावळा : लोणावळा शहराच्या विकासाला गती देण्यासाठी पुढील आठवड्यात तब्बल २१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत शहरातील पाच प्रमुख रस्त्यांच्या कामांना ३५ ते ४० कोटी रुपयांच्या अपेक्षित खर्चातून सुरुवात करण्यात येणार आहे. याशिवाय १५ नोव्हेंबरनंतर शहरातील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोणावळा नगरपरिषदेच्या विविध विकासकामांची माहिती देताना आमदार शेळके यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामे हाती घेण्यात येत असल्याचे सांगितले. शहरातील वाहतूक व्यवस्था, रस्ते, पर्यटन आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२,०२७ पूरग्रस्त कुटुंबांना ३० हजारांची मदत
लोणावळ्यातील पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासन, लोणावळा नगरपरिषद आणि टाटा कंपनी यांच्या माध्यमातून २,०२७ कुटुंबांना प्रत्येकी ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित कुटुंबांच्या खात्यात ५ नोव्हेंबरपूर्वी मदतीची रक्कम जमा करण्याचा प्रयत्न असल्याचे शेळके यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्तांना दिवाळीची भेट म्हणून ‘आनंदाचे दिवाळी किट’ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
सहारा पूल परिसरात लेझर शोसह सुशोभीकरण
लोणावळ्याच्या पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी सहारा पूल परिसराचे ४ ते ५ कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये लेझर शोसह विविध आकर्षक सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. तसेच नमो उद्यानासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होणार असून उत्कृष्ट उद्यानांच्या निर्मितीसाठी स्पर्धात्मक संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टपऱ्यांसाठी समान आकारमान, हॉकर्स झोनचा प्रस्ताव
शहरातील अतिक्रमणांच्या प्रश्नावर बोलताना प्रत्येक टपरीचे आकारमान तपासण्यात येणार असून सर्व टपऱ्या एकसमान असाव्यात, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले. शहरात हॉकर्स झोन निर्माण करण्याचाही प्रस्ताव असून यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी नमूद केले.
पुणे ग्रँड टूरमुळे लोणावळ्याला राष्ट्रीय ओळख
२८ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या पुणे ग्रँड टूरचे आयोजन लोणावळ्यात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे लोणावळ्याच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि शहराची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, बांधकाम समिती सभापती सनी दळवी, आरोग्य समिती सभापती संजय काळोखे, नगरसेवक निखिल कवीश्वर, मुकेश परमार, शिक्षण व क्रीडा समिती सभापती दीपा अगरवाल, गटनेते मंगेश मावकर, नगरसेवक सुमित गवळी, जाकीर खलिफा तसेच नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

admin

meghnachitte94@gmail.com https://mavalpatrika.online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

Trending News

Editor's Picks

लोणावळ्यात २१ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन

पुढील दोन महिन्यांत ३५ ते ४० कोटींच्या पाच प्रमुख रस्त्यांची कामे सुरू होणार लोणावळा : लोणावळा शहराच्या विकासाला गती देण्यासाठी पुढील आठवड्यात तब्बल २१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत शहरातील पाच प्रमुख रस्त्यांच्या कामांना ३५ ते ४० कोटी रुपयांच्या अपेक्षित खर्चातून सुरुवात करण्यात येणार आहे. याशिवाय १५ नोव्हेंबरनंतर...

न्यायालयीन संघर्षाचा थरार; उज्ज्वल निकम यांचा लोणावळ्यात पोलिसांशी संवाद!

‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनातून कायदेशीर लढाई, भक्कम पुरावे आणि न्यायासाठीच्या चिकाटीचा संदेशलोणावळा : दहशतवादाविरुद्धचा लढा केवळ शस्त्रांनी नव्हे, तर भक्कम पुरावे, सक्षम कायदेशीर प्रक्रिया आणि न्याय मिळविण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीनेही जिंकता येतो, याचा प्रत्यय लोणावळ्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपटाच्या...

मागळा पत्रिका हे लोणावळा आणि परिसरातील नागरिकांसाठी समर्पित मराठी न्यूज पोर्टल आहे. स्थानिक घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या आणि जनहिताच्या विषयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

Popular Categories

Must Read

©2026 All Right Reserved. Designed and Developed by datadestiny.online